Alert ! SIM आणि whatsapp च्या मदतीने तुमचा पैसा होऊ शकतो चोरी , अशा प्रकारे राहा सुरक्षित
नमस्कार मित्रानो सर्वप्रथम तुमचे मराठीहेल्पर .कॉम वर सहर्ष स्वागत ..!
टेक न्यूज : आजच्या डिजिटल युगात खूप fraud होत आहेत आणि रोज कितीतरी घटना घडत आहेत .
अशा स्थिस्ती मध्ये आपल्याला खूप सतर्क राहण्याची गरज आहे . आपण सर्वजण अशा चुका कळत नकळत आपल्याकडून होत असतात . अशा खूप घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये यूजर चा डेटा लीक झाला आहे आणि पैसे चोरीला गेले आहेत .
तुम्हाला माहित आहे का अशा घटना का होतात ?
आजकाल आपण सर्वजण ऑनलाईन पयमेन्ट करतो पण या online पयमेन्ट करण्यामुळे आपली माहिती लीक
होणं हि सामान्य गोष्ट आहे . डिजिटल पयमेन्ट च्या यूज मुळे fraud च्या घटना खूप प्रमाणात वाढल्या आहेत.
आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत जेणे करून अशा घटना तुमच्या सोबत घडू नयेत .
![]() |
| Beware of Online Fraud |
ऑनलाईन fraud पासून वाचन्यासाठी करा हे उपाय :
१. लक्षात ठेवा आपली बँक डिटेल्स , ATM PIN किंवा password कोणासोबत शेयर करू नका । जर तुम्हाला
एखादा फर्जी मेसेज आला तर सतर्क राहा फर्जी मेसेज ला कसलाही रिप्लाय देऊ नका .
२. बऱ्याच वेळा असं होत कि हॅकर्स आपल्याला whatsapp वर QR कोड शेयर करतो आणि मेसेज करतो हा QR कोड स्कॅन केला कि तुमच्या अकाउंट ला पैसे येतील . अशा स्थिती मध्ये QR कोड स्कॅन करू नका तसेच कुणालाही ATM कार्ड नंबर आणि OTP सांगू नका .
३. बऱ्याच वेळा हॅकर्स तुमच्या सिम कार्ड चा उपयोग करतात तो कसा ,तर ते तुम्हाला कस्टमर एक्सकटीव्ह बनून तुम्हाला कॉल करतात आणि तुम्हाला SIM Activate करण्यासाठी सिम कार्ड नंबर विचारतात . असे कॉल
किंवा मेसेज आल्यावर त्यांना तुमच्या सिम ची माहिती देऊ नका .
४. अनेक वेळा fraud लोक बँक अधिकारी बनून कॉल करतात ते तुम्हाला फोन करून अकाउंट डिटेल्स मागतात त्यांना आपली बँक डिटेल्स सांगू नका .
"बँक अधिकारी आपल्याला फोन करून बँक डिटेल्स मागू शकत नाही तसेच आपला ATM नंबर , CVV नंबर कोणाशीही शेयर करू नका "

0 Comments