How To Write Cancel Cheque|Bank Cheque कसा भरायचा ? 

जेंव्हा आपण नवीन बँक अकाउंट (Bank Account ) open करतो तेंव्हा आपल्याला बँकेतून चेकबुक (chequebook) दिल जात किंवा तुमच्याकडं Option असत कि चेकबुक पाहिजे कि नाही . बरेच लोक बँकेतून चेकबुक घेतात. पण बऱ्याच लोकांना Cheque कसा भरायचा ते माहित नसत. Cheque भरताना थोडी चूक झाली तर चेक फाडून टाकावा लागतो त्यासाठी तुम्हाला चांगल्याप्रकारे भरता येईला हवा . तर चला या आर्टिकल मध्ये जाणून घेउया Bank Cheque कसा भरायचा ? How To Fill a Bank Cheque Details in Marathi

बँक चेक भरणं खूप सोपं आहे तुमची बँक कोणतीही असु दया . सर्व बँकांचे cheque भरण्याची पद्धत एकच आहे . चेक चा वापर बऱ्याच ठिकाणी होतो . जर कोणाला पैसे द्यायचे असतील तर चेक च्या माध्यमातून देऊ शकता . जर तुमची Bank Details कोणाला द्यायची असेल तर तुम्ही cancel cheque देऊ शकता . जर तुम्हाला स्वतः cheque ने पैसे काढायचे असतील तर Self Cheque देऊन काढू शकता . तर चला जाणून घेउया चेक कसा भरायचा . 

Bank Cheque कसा भरायचा :-

1. Pay च्या जागेवर नाव टाका 

जर तुम्ही बँकेचा Cheque बघाल तर वरच्या साईडला pay लिहलेलं दिसेल . pay चा अर्थ असा कि तुम्हाला ज्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांचे नाव pay च्या जागेवर लिहायचे आहे . 
Bank Cheque कसा भरायचा ?
How to fill Bank cheque

टिप :-तुम्हाला pay च्या जागेवर तेच नाव टाकायचे आहे जे नाव बँक अकाउंट वर आहे . तुम्ही ज्यांना cheque ने पैसे पाठवत आहात त्यांना एकदा विचारून घ्या कि त्यांच्या बँक अकाउंट ला नाव कसं आहे तेच नाव चेक वर टाका 

2. आता पैसे टाका किती द्यायचे आहेत ते :

pay मध्ये नाव टाकल्यानंतर किती पैसे द्यायचे आहेत ते टाकावं लागेल . किती पैसे द्यायचे आहेत ते Rupees च्या लाईन मध्ये टाका . समजा तुम्हाला १०००० (दहा हजार रुपये ) रुपये  द्यायचे आहेत तर तुम्हाला दहा हजार रुपये फक्त असं लिहावं लागेल . 

Bank Cheque कसा भरायचा ?
How to fill Bank cheque

रु : या जागेवर आकड्यामध्ये रक्कम लिहा दहा हजार रुपये आहे तर 10000/- असं लिहा . 

3. आता Sign आणि Date टाका :-

नाव आणि रुपये टाकल्यानंतर (Bank Cheque ) चेक मध्ये तुम्हाला Signature करावी लागेल . तुम्हाला जिथे Signature किंवा Authorised लिहिलेलं आहे  त्याच्यावर तुम्हाला सही करायची आहे . जी सही तुम्ही बँक मध्ये केली आहे तीच सही cheque वर करा . जर तुम्ही दुसरी सही केली तर तुमचा चेक Cancel होईल .
Bank Cheque कसा भरायचा ?
How to fill Bank cheque


लक्षात ठेवा :- Cheque च्या वरच्या साईडला जिथे pay लिहलेलं आहे त्याच्यावर तिरखी रेष मारून A /C payee लिहा कारण पैसे फक्त लिहलेल्या नावावरच जावेत . तर अशा प्रकारे तुम्ही बँक चेक भरू शकता . लक्षात ठेवा बँक चेक भरताना त्यामध्ये कसल्याप्रकारची खाडाखोड करू नका . ज्यांना पैसे पाठवायचे आहेत  त्यांचं नाव बरोबर टाका त्यानंतर सही बरोबर करा .अशा प्रकारे चेक भरला तर चेक कॅन्सल होणार नाही .

तुम्हाला आमचे आर्टिकल आवडले असेल तर शेयर नक्की करा