तुम्हाला माहित आहे का Fastag काय आहे ?
![]() |
| image source : Fastag |
नमस्कार मित्रानो , भारत सरकारने Fastag हा वाहनधारकासाठी 15 डिसेंबर 2019 पासून बंधनकारक केला आहे। तर चला आपण जाणून घेऊया What is Fastag | Fastag काय आहे ? ,पण त्याआधी जाणून घेऊयात टोल टैक्स काय आहे.
टोल टैक्स म्हणजे काय ?
टोल टैक्स म्हणजे आपण जेंव्हा गाड़ी National - Highway वर Four -Wheelar गाड़ी चालवतो तेंव्हा आपल्याला टैक्स द्यावा लागतो। टैक्स कसा भरायचा ? भारत सरकारने सर्व National - Highway वर टोल टैक्स जमा करण्यासाठी टोल नाके बनवले आहेत। जेंव्हा तुम्ही National - Highway वर जाता तेंव्हा टोल नाक्यावर थांबून तुम्हाला टैक्स भरावा लागतो। ह्या पद्धतीमुळे टोल नाक्यावर खुप गर्दी होते आणि टाइम पण जातो। ही पद्धत बंद करून भारत सरकारने डिजिटल पद्धतीने टैक्स जमा करण्यासाठी Fastag अनिवार्य केल आहे.
Fastag काय आहे ?
टोल टैक्स डिजिटल पद्धतीने भरायचा म्हटल तर कंप्यूटर सिस्टम ला कस कळेल की कोणत्या गाडी ने टैक्स भरला आणि कोणत्या गाड़ी ने टैक्स भरला नाही ? त्यासाठी नविन सिस्टम बनवली आहे या सिस्टम मध्ये एक चिप बनवली आहे त्या chip ला RFID कार्ड सुद्धा म्हणतात. या RFID कार्ड चा use करून पैसे collect केले जातात याच आधारावर टोल टॅक्स साठी Fastag बनवलं आहे . या fastag च्या मदतीने टॅक्स कल्लेक्ट करण्यास सोपं होईल . Fastag हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस आहे .

0 Comments