आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा ?(how to change address in aadhar card )
| आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा ?how to change address in aadhar card |
Aadhar card address update :- आधार कार्ड काढत्या वेळी address मध्ये काही चूक झाली असेल , किंवा address टाकण्यात चुकला असेल अशा स्थिती मध्ये तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड वरील पत्ता (address ) बदलू शकता किंवा update करू शकता .
आधार कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र आहे , असे बरेच काम आहेत कि ती आधार कार्ड शिवाय होऊच शकत नाहीत . आधार कार्ड वर पत्ता चुकलेला असेल तर बदलून घेणं खूप गरजेचं आहे . आधार कार्ड update साठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही . तुम्ही घरी बसून आधार अपडेट करू शकता . आधार कार्ड च्या official वेबसाईट वर आधार कार्ड अपडेट ऑनलाईन ची सेवा उपलब्ध आहे .
सर्वप्रथम तुम्हाला माहित पाहिजे कि , आधार कार्ड अपडेट करण्यासाठी Registerd मोबाईल नंबर तुमच्यापाशी पाहिजे . aadhar card update करतेवेळी मोबाईल नंबर वर OTP पाठवला जातो . जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या आधार सेंटर वर जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घ्या .
अशा पद्धतीने करा Aadhar card Address update :-
1. सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या Official website वर जावे लागेल .
2. त्यानंतर होमपेज वर तुम्हाला Address update Request online वर क्लिक करा .
3. क्लिक केल्यानंतर update your address online वर क्लिक करा .
4. जर तुमच्याकडे address proof नसेल तर Request for Address Validation Letter वर क्लिक करा .
5.हि प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि captcha कोड टाका व Send OTP वर क्लिक करा .
| आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा ?how to change address in aadhar card |
6.Send OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या registerd मोबाईल वर OTP येईल , तो OTP टाकून लॉगिन करा .
| how to change address in aadhar card ? | आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा ? |
7. लॉगिन केल्यानंतर तुमच्याकड adderss proof असेल तर Update Address Via Address Proof वर क्लिक करा. जर ऍड्रेस प्रूफ नसेल तर Update Address Via Secret Code वर क्लिक करा .
8. त्यानंतर तुम्हाला आधार address update चा फॉर्म open होईल त्या फॉर्म मध्ये गरजेनुसार माहिती भरा .
माहिती भरल्यानंतर एकदा भरलेली माहिती बरोबर आहे का ते check करा .
9. माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर update Request वर क्लिक करा .
Address बदलण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-
address update request केल्यानंतर पुढची स्टेप आहे ती document सबमिट करण्याची , त्यासाठी काही महत्वाची documents लागतात . त्यामध्ये पासपोर्ट , बँक स्टेटमेंट , बँक पासबुक , पोस्ट ऑफिस अकाउंट पासबुक , राशन कार्ड , मतदान कार्ड इत्यादी कागदपत्रे लागतात .
तुम्हाला या पैकी कोणत्याही कागदपत्रांची सेल्फ attached photocopy अपलोड करावी लागेल .
बीपीओ सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड करा :-
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर बीपीओ सर्व्हिस provider मध्ये अचूक पर्याय निवडा .
त्यानंतर Request Submit बटण वर क्लिक करा .
वरच्या सर्व स्टेप केल्यानंतर तुम्हाला अपडेट request नंबर मिळेल त्याची प्रिंट काढून ठेवा . आधार अपडेट झाल्यानंतर तुमच्या नवीन पत्त्यावर आधार कार्ड येईल .
0 Comments